मौजे घोसापुरीत लिंबाचे झाड तोडले
मौजे घोसापुरीत लिंबाचे झाड तोडले
सात जणांविरुद्ध गुरखुदे यांची तक्रार
बीड (प्रतिनिधी)-बीड शहराजवळील मौजे घोसापुरी येथील गट नं.135 मध्ये 30 ते 40 वर्ष जुने लिंबाचे झाड होते. सदरील झाड तोडल्या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग आणि जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे अन्नुलाल गणेशलाल गुरखुदे यांनी लेखी तक्रार दिली असून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजेश हनुमाललाल गुरखुदे, शिवम राजेश गुरखुदे, कृष्ण रमेश गुरखुदे, अमरिष हनुमानलाल गुरखुदे व इतर तिघांनी यापुर्वी शेतातील नुकसान केल्याबद्दल व मारहाण केल्याबद्दल त्यांच्या विरुध्द ग्रामीण पोलीस स्टेशन बीड येथे तक्रार दिली होती त्याचा राग मनात धरुन दि.23 जून 2025 रोजी अन्नुलाल गणेशलाल गुरखुदे यांच्या शेतातील लिंबाचे झाड बेकायदेशीररित्या तोडले आहे त्यांचे हे कृत्य बेकायदेशीर असून अनाधिकृत आहे त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.