Uncategorized

बीड येथे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद :- प्रा. सुशीलाताई मोराळे.

बीड येथे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद :- प्रा. सुशीलाताई मोराळे. बीड / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकार संघ पुणे व सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे विद्यमाने बीड येथे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका पतसंस्था संचालक कर्मचारी यांच्या करिता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे सर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेचे सरस्वती पूजन करण्यात आले या तीन दिवसीय प्रशिक्षणात जिल्हा उपनिबंधक एस. एम. तोटावार सहाय्यक निबंध अशोक कदम साहेब, आर एस बोडके साहेब अकोला, एन एन कुलकर्णी साहेब सोलापूर, आदेश नहार साहेब सी. ए., डॉ. मनमत हेरकर सर सी ए खोडसे साहेब, प्रमाणित लेखा परीक्षक बीड सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे उपप्राचार्य एस. आर. कोळे साहेब, यांनी मा.सहकार आयुक्त यांनी दिलेल्या अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गास बीड जिल्हा सहकार बोर्डाचे उपाध्यक्ष सुहास पाटील साहेब यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालिका प्रा.सुशीलाताई मोराळे व प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक राजयोग चे संपादक वैभव स्वामी हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचलन आभार प्रदर्शन वर्ग संयोजक एस. आर. कोळे साहेब उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात व यशस्वी पार पाडण्यात बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे सर यांनीही मोलाचे सहकार्य केले तसेच बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही सहकार्य केले व शेवटी आभार प्रदर्शन हेरकर सर यांनी केले*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *